दिशा समितीची बैठक विविध विषयांचा सविस्तर आढावा घेत यशस्वीरीत्या संपन्न.मतदारसंघातील विविध समस्या लक्षात घेऊन नागरिकांनी सादर केलेल्या निवेदनांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. कृषी, शिक्षण, आरोग्य, वनविभाग, एमआरजीएस, एमएसईबी, पीएमजीएसवाय, बीएसएनएल, डाक विभाग, समाजकल्याण, जलजीवन मिशन, प्रदूषण विभाग, कौशल्य विकास आदी अनेक विभागांचा सखोल आढावा घेऊन संबंधित समस्या तातडीने सोडविण्याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले.