स्वामी विवेकानंद वार्ड रामटेक (कुंभारपुरा) येथील गाव तलावाच्या जवळील विद्युत विभागाच्या ट्रांसफार्मरला रविवार दिनांक 8 फेब्रुवारीच्या रात्री 11.30 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. स्पार्किंग सह फटाका फुटण्यासारखे मोठे घाबरवणारे आवाज येत असल्याचे लक्षात येतात नजीकचेच सुजाण नागरिक अनिकेत केळवदे याने स्थानिक नगरसेवक अभिषेक डहारे यांना याची माहिती दिली. त्यांनी तात्काळ विद्युत विभागाची मदत घेऊन आग आटोक्यात आणली. यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.