‘सिंधुदुर्ग ओपन वॉटर स्विमिंथॉन’ स्पर्धेत पनवेलची कन्या रुद्राणी पाटीलने केली उत्कृष्ट कामगिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे सोमवारी पार पडलेल्या सिंधुदुर्ग ओपन वॉटर स्विमिंथॉन या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत पनवेल तालुक्याची कन्या रुद्राणी पाटील हिने उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत ५०० मीटर सी स्विमिंग प्रकारात रुद्राणी हिने ११ मिनिटे २५ सेकंद या वेळेत अंतर पूर्ण केले. ७ वर्षांखालील वयोगटातील ३४ स्पर्धक मुलींमध्ये तिने चौथा क्रमांक पटकावत आपल्या गुणवत्