भंडारा: तुमच्या बापाचा आहे काय? : आमदार नाना पटोले यांचा खासदार पटेल व महसुलमंञी बावनकुळे यांच्यावर घणाघाती हल्ला
स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या प्रचाराला वेग आला असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी प्रफुल पटेल व चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर नामोल्लेख करत तिखट टीका केली. प्रचारसभेत बोलताना पटोले यांनी दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांवर व कार्यशैलीवर जोरदार प्रहार केला. सभेत बोलताना पटोले म्हणाले की, “प्रफुल पटेल लोकांसमोर गोष्टी सांगत फिरतात. मी खुद्द गोंदियात जाऊन आलो, तिथल्या रस्त्यांची परिस्थितीच वेगळी आहे. आमची साकोली तरी बरी आहे. गोंदियात मोठमोठे डास, वाईट रस्ते…