भुसावळ: भुसावळ नगरपरिषद निवडणूक प्रभाग क्रमांक 7 'अ ' मधून प्रिती मुकेश पाटील बिनविरोध
भुसावळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत प्रभाग क्रमांक 7 'अ' मधून महिला राखीव गटातून प्रिती मुकेश पाटील या बिनविरोध निवडून आल्या आहे. नामनिर्देशन पत्र छाननीत त्यांच्या विरोधातील उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने त्यांचा हा बिनविरोध विजय असल्याची माहिती दि. १९ नोव्हेंबर रोजी नगरपालिका प्रशासनाने दिली.