उदगीर तालुक्यातील कुमठा खुर्द येथे १२ डिसेंबर रोजी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त भागवत केंद्रे मित्र मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये ७६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.गोपीनाथ मुंडे यांची ७६ वी जयंती असल्यामुळे ७६ लोकांनी रक्तदान केले.यावेळी भागवत केंद्रे मित्र मंडळाचे पदाधिकारी व गावातील तरुण या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला