साकोली: राष्ट्रीय महामार्गावर उकारा फाट्याजवळ विचित्र अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू,साकोली पोलिस ठाण्यात घटनेची नोंद
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर साकोलीजवळील उकारा फाट्याजवळ शनिवार दि31 मे ला दुपारी चारच्या सुमारास एका विचित्र आणि दुर्दैवी अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला.यादवराव गोपाळराव वघारे वय 36 रा.आमगाव व जितेंद्र रवींद्र उपराटे वय 28 रा. मोहनटोला ता.आमगाव या दोघांचा मृतांत समावेश आहे.हे दोघे मोटरसायकलने नागपूरकडे जात असताना उकारा फाट्याजवळ टाटा मॅजिक गाडीने मोटरसायकलला धडक दिली.रस्त्यावर पडलेल्या दोघांना कारने चिरडल्याने दोघाचा मृत्यू झाला.साकोली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली