राज्यात लोकसेवा आयोग व विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या संस्था, केंद्रे व विद्यार्थी संख्येची सांख्यिकीय माहिती शासनाने संकलित करावी, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. महाज्योती संस्थेच्या प्रशिक्षण व विद्यावेतनाबाबत उपस्थित प्रश्नांना उत्तर देताना मंत्री अतुल सावे यांनी ऑफलाईन प्रशिक्षण व विद्यावेतन योजना सुरू असल्याचे स्पष्ट केले.