ग्रामीण भागात असलेल्या माथनी शेतशिवारात वाघाने एका गायीची शिकार केल्याची घटना घडली याबाबत चे वृत्त असे की माथनी, राहडी, नानादेवी शिवारात वाघाचा वावर असल्याने माथनी शेतशिवारात वाघाने एका गायीची शिकार केली .शेतकऱ्याचे अंदाजे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले .घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनकर्मचारी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. नुकसान ग्रस्तास भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.