बुलढाणा: सत्तेची भूक एखाद्या व्यक्तीला किती असावी?भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांची आ. संजय गायकवाड त्यांच्यावर टीका
बुलढाण्यात महायुतीतील भाजपा आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे.पत्नी,मुलगा पुतण्या व्याही आणि जावई सर्व उमेदवारी एकाच घरात दिली जात असल्याचं सांगत एखाद्या व्यक्तीला सत्तेची भूक किती असावी?असा सवाल उपस्थित करत भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी बुलढाणा आ.संजय गायकवाड यांच्यावर आज 23 नोव्हेंबर रोजी दुपारी टीका केली.