तेल्हारा: सिरसोली येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न.
Telhara, Akola | Mar 24, 2024 दम्माणी नेत्र रुग्णालय , रोटरी क्लब हँगिंग गार्डन,मुंबई, स्व. बाबासाहेब खोटरे विद्यालय सिरसोली आणि कस्तुरी चॅरिटेबल सोसायटी,अकोला या विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने तेल्हारा तालुक्यातील सिरसोली येथील स्व. बाबासाहेब खोटरे विद्यालयात मोफत नेत्रतपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन आज सकाळी ११ वाजता करण्यात आले..या शिबिरात लोहारी, पाथर्डी, नेव्होरी, अडगाव (खु.), जळगाव ( नहाते ),काळेगाव, भोकर, वरुड (बु.), राणेगाव व सिरसोली येथील एकूण ३७५ नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली