छत्रपती संभाजीनगर : हर्सुल परिसरात सामाजिक व राजकीय क्षेत्रात भक्कम कार्याची ओळख निर्माण करणाऱ्या, कणखर व प्रभावी महिला नेत्या माजी नगरसेविका ज्योती अभंग, तसेच हर्सुलमधील युवा नेतृत्व युवराज वाकेकर, नंदू वाकेकर आणि जयेश अभंग यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.