वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिराच्या समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळाच्या परिसरात अतिक्रमण व घाणीचे साम्राज्य पसरलेले असल्याचे चित्र समोर आले आहे.या ऐतिहासिक स्थळाच्या आसपास दारूच्या रिकाम्या बाटल्या, कचरा व अस्वच्छता मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे समाजकंटकांचा वावर वाढला असून वारशाची अवहेलना होत आहे.