हिंगणघाट तालुक्यातील वडनेर सिरसगाव रस्त्यावर टिप्पर ने मालवाहूला जबर धडक दिली या अपघात चालकासह एक जखमी झाल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.प्राप्त माहितीनुसार मालवाहू क्रमांक एम एच ४८ बि.जी.३८१३ ने जखमी हिमांशु हुलके आणि दिवाकर वांदिले राहणार अल्लिपुर हे दोघे वडनेर सिरसगाव रस्त्याने जात असताना टिप्पर क्रमांक एम.एच ४८ ए.वाय ८०५४ ने धडक दिली या अपघातात हिमांशु हुलके आणि दिवाकर वांदिले जखमी झाले यासंबंधी वडनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.