पांडूरंग ताजणे महाराज यांच्या गोपालकाल्याच्या किर्तणाने व महाप्रसादाचे वितरण करुन शहरातील गणेशत्त गुरुपंचायतन मंदिरात सुरु असलेल्या दोन दिवसीय श्री दत्तजयंती ऊत्सवाची मोठ्या ऊत्सहात सांगता करण्यात आली.त्यापुर्वी मंदिरातून श्री दत्ताच्या पालखीची शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली.या शोभायात्रेत शहरातील शेकडो भाविक सहभागी झाले होते.