अकोला जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामासाठी पीकविमा काढण्याची अंतिम मुदत सोमवारी, १५ डिसेंबर रोजी संपुष्टात आली. या मुदतीत दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण ३९ हजार १७३ शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचा विमा काढला असल्याची माहिती कृषी विभागाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. विमा काढलेल्या पिकांमध्ये प्रामुख्याने हरभरा आणि गहू या पिकांचा समावेश आहे. यामध्ये कर्जदार तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग आहे.