पोवार समाजाच्या वतीने नगर परिषद, गोंदिया चे नवनिर्वाचित उपाध्यक्ष संतोष पटले, नगरसेवक मैथुला बिसेन व शिशिर बिसेन नगरसेवक यांचा पोवार प्रगतिशील मंचच्या वतीने शाल, श्रीफळ भेंट देत सत्कार करण्यात आला. व शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पवार समाजाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पप्पू पटले, एडवोकेट टी.बी. कटरे,भागचंद रंहागडाले, आदी पोवार समाज बांधव यावेळी उपस्थित होते.