अकोट: उज्वल नगर येथे इलेक्ट्रिक खांब व तारांना अडथळा ठरणाऱ्या वृक्षामुळे शॉर्ट सर्कीटची समस्यां<nis:link nis:type=tag nis:id=jansamasya nis:value=jansamasya nis:enabled=true nis:link/>
Akot, Akola | Nov 27, 2025 शहरातील उज्वल नगर परिसरात मध्ये इलेक्ट्रिक खांब तारांना अडथळा ठरणाऱ्या वृक्षामुळे शॉर्ट सर्किटची समस्या वारंवार उद्भवत आहे. दरम्यान उज्वल नगर येथील छोटु वानखडे यांच्या घराजवळील भल्या मोठ्या वृक्षामुळे या वृक्षा खालून जाणाऱ्या विद्युत खांब व विद्युत खांबावरील वीज तारांचे घर्षण होऊन वारंवार शॉर्टसर्किटची समस्या या ठिकाणी निर्माण होत असल्याने परिसरातील नागरिक हे त्रस्त झाले आहेत तरी संबंधित प्रशासनाने या समस्येची तात्काळ दखल घेणे गरजेचे झाले असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.