वरली मटका नावाचा जुगार खेळणाऱ्या एका इसमास खामगांव ग्रामीण पोलिसांनी २२ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेदरम्यान शहापुर येथे पकडले.व त्याच्या ताब्यातून २४५ रुपयाचा जुगार साहित्य जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.पो का रामधन गवळी यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहापुर येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून अनील श्रीराम अढाव वय 45 वर्ष रा शहापुर यास पकडले.