तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण राहिल्याने हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. सध्या हरभरा पीक फुलोरा व घाटे धरण्याच्या अवस्थेत असल्याने हा हल्ला अधिक घातक ठरत असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक शेतांमध्ये हरभऱ्याचे घाटे पोखरलेले व पाने कुरतडलेली दिसत असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.