निफाड: रुई ता.निफाड येथे रस्त्याचा प्रश्न चिघळला; ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू ; शासनाला दोन दिवसांची अल्टीमेटम
शिरवाडे वाकद:
Niphad, Nashik | Nov 19, 2025 रुई ता.निफाड येथे रस्त्याचा प्रश्न चिघळला; ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू ; शासनाला दोन दिवसांची अल्टीमेटम निफाड .:- जुना खेडलेझुंगे रस्त्याची अवस्था दयनीय झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या रस्ता कामास तातडीने मंजुरी मिळून काम सुरू व्हावे या मागणीसाठी रुई ता.निफाड येथील ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत. येत्या दोन दिवसात ठोस निर्णय न झाल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.