नांदुरा: ग्राम पोटा येथून १८ वर्षीय युवती बेपत्ता
नांदुरा तालुक्यातील ग्राम पोटा येथून १८ वर्षीय युवती बेपत्ता असल्याची नोंद १४ नोव्हेंबर रोजी बोराखेडी पोलिसात करण्यात आली आहे.प्रणाली गोविंदा कुटे वय १८ वर्ष रा.पोटा तालुका नांदुरा असे बेपत्ता युवतीचे नाव असून सदर युवती ही घरून कुणाला काहीही न सांगता घरून निघून गेली.तिचा नातेवाईकाकडे व आजूबाजूला शोध घेतला असता आढळून आली नाही. म्हणून नातेवाईकांनी याबाबत पोलिसात हरवल्याची माहिती दिली असून बोराखेडी पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.