विरली बु येथे महाराजस्व समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ;431 नागरिकांनी घेतला लाभ
राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिर टप्पा एक अंतर्गत विरली बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत शनिवारी भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात एका छताखाली 15 प्रकारच्या शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून एकूण 431 नागरिकांनी विविध योजनांच्या लाभ घेतला तर यावेळी उपजिल्हाधिकारी श्री लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती