परळी वैजनाथ नगर परिषद निवडणूक 2025 पार्श्वभूमीवर वाढत्या तणावाच्या परिस्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संध्या दीपक देशमुख व त्यांचे पती दीपक रंगनाथ देशमुख यांनी आज बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन पोलिस संरक्षण देण्याची औपचारिक मागणी केली. तसेच खासदार बजरंग सोनवणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे संरक्षण देण्याची विनंती केली होती. मात्र अद्याप प्रत्यक्ष संरक्षण उपलब्ध झाले नसल्याने आज पुन्हा मागणी करण्यात आली.