भुसावल नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीकडे शहरासह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे नगरपरिषद ची निवडणूक प्रक्रिया 21 रोजी पूर्ण झाल्यानंतर प्रशासकीय नियमानुसार मंगळवार दिनांक 15 जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष निवडसाठी पहिली विशेष सभा बोलवण्यात आली आहे या सभेची लेखी सूचना सर्व नगरसेवकांना देण्यात आली असून सभा भुसावळ येथील प्रांत कार्यालय ताप्ती सभागृहात होणार आहे ही सभा लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे