आज दिनांक दोन डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या दरम्यान भोकर येथे नगरपंचायत व नगरपरिषदचा निकाल 21 डिसेंबर पर्यंत लांबणीवर टाकल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा अनुभव पाहता एका जागेची निवडणूक पुढे ढकलली,तर त्याचा परिणाम निकालावर होऊ नये, म्हणून सर्वच मतमोजणी एकत्रित केली जाते, त्यामुळे निवडणूक आयोगाने स्थानिक निवडणुकांच्या बाबतीत देखील असाच विचार केला असावा, अशी प्रतिक्रीया माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी भोकर येथे दिली