चाळीसगाव: सिंधी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या: चाळीसगावात तीव्र संताप!
छत्तीसगड येथील अमित वघेला यांनी सिंधी समाजाचे इष्टदेव भगवान झुलेलाल यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चाळीसगांवमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने, संतप्त सिंधी समाजाने आज (६/११/२०२५) एकत्र येत चाळीसगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित मनेळ यांना निवेदन सादर केले आणि वघेला यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.