देवगाव परिसरात पुन्हा वाढला बिबट्यांचा शिरकाव; बावीस दिवसांत तिसरा बिबट्या जेरबंद – ग्रामस्थांत भीतीचं सावट देवगाव : देवगाव परिसरातील बिबट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं सावट अधिकच दाट होत असताना, आज पहाटे येथील पोलीस पाटील सुनिल बोचरे यांच्या गट क्रमांक ४१४/२ मधील पिंजऱ्यात अंदाजे पाच वर्षे वयाचा नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला. बावीस दिवसांत हा तिसरा बिबट्या पकडला गेल्याने गावकऱ्यांत तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पहाटे पाचच्या सुमारास पिंजऱ्यात जोराची