स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय हॉस्पिटल अमरावती. येथे ६२ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सदर रुग्ण हा किडनी आजाराने त्रस्त असल्याने त्यासाठी बाहेर उपचार पद्धती चालू होती व काही महिन्यांपासुन डायलिसिस करत होता . तेव्हा डॉक्टरांनी रुग्णास व त्याच्या कुटुंबीयास किडनी प्रत्यारोपण विषयी माहिती दिली. तेव्हा आज रुग्णालयात झालेले ६२ वे किडनी प्रत्यारोपण, हे २७ वर्षीय शुभम विष्णु खोबरखेडे यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे.