बुलढाणा: जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देऊळघाट येथे नशा मुक्ती अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांनी घेतली नशा मुक्तीची शपथ
बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे शासन निर्देशानुसार आज 19 नोव्हेंबर रोजी दुपारी नशा मुक्ती अभियान अंतर्गत व्यसनाधीनते विरुद्ध जनजागृती व प्रबोधन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शाळेचे प्राचार्य आर.आर.सय्यद यांनी मार्गदर्शन करून नशा पासून दूर राहण्याचे आवाहन केले तसेच सर्व विद्यार्थ्यांना नशा मुक्तीची शपथ देण्यात आली.यावेळी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.