भुसावळ: वरणगाव-मुक्ताईनगर महामार्गावर क्रेनची रिक्षाला धडक, एक ठार
वरणगाव-मुक्ताईनगर महामार्गावर हॉटेल चाहेलजवळ क्रेनने रिक्षाला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात रिक्षा चालक ठार झाला आहे. या प्रकरणी रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १८ नोव्हेंबर रोजी वरणगाव पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली.