जालना शहरातील कन्हैय्यानगर परिसरात महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता रॅली काढल्याप्रकरणी प्रभाग क्रमांक 2 मधील उमेदवार मनोज हरीकिशन शर्मा यांच्याविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रविवार दि. 11 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजता पोलीस सुत्रांनी दिली. दि. 9 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6.10 वाजता डायल 112 वर कन्हैय्यानगर भागात रॅलीदरम्यान रॅली अडवणुकीचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.