चाळीसगाव: चाळीसगावमध्ये 'उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीवर १५ कोटींच्या कर्ज फसवणुकीचा गुन्हा!
चाळीसगाव देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड (छत्रपती संभाजीनगर) च्या चाळीसगाव शाखेची तब्बल ₹ १५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मे. उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड (M/s. Umang White Gold Pvt. Ltd.) कंपनीचे संचालक आणि जामीनदारांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेकडे नजरगहाण (Hypothecation) ठेवलेली ₹ ५.३३ कोटींहून अधिक किमतीची मशिनरी परस्पर विकून रकमेचा अपहार केल्याचा आरोप आहे.