भंडारा: मद्यधुंद युवकाची दुचाकी चारचाकीला धडकली; कवडसी फाटा येथील घटना! गुन्हा दाखल
भंडारा तालुक्यातील भंडारा ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर कवडसी फाटा येथे हा अपघात घडला. या घटनेतील आरोपी नामे समीर बलसिंग देवळे (वय २१ वर्ष, रा. आकोली, तालुका सेलु, जिल्हा वर्धा) याने त्याच्या ताब्यात असलेली काळ्या रंगाची रॉयल एनफिल्ड मोटारसायकल (क्रमांक एमएच ३२ एजी ६८४७) दारूच्या अंमलाखाली अतिवेगाने व बेदरकारपणे चालवली. नागपूरच्या दिशेने जात असलेल्या फॉर्च्युनर (क्रमांक एमएच ०२ एफएक्स ९९९२) ला त्याने मागून जोरदार धडक दिली, ज्यामुळे तो स्वतः जखमी झाला आहे.