चाळीसगाव: चाळीसगावचा विकास खुंटेल! नगराध्यक्षांसह भाजपाला सत्ता द्या: मंत्री संजय सावकारे यांचे आवाहन
चाळीसगाव (प्रतिनिधी): राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे यांनी चाळीसगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांना महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. "तुमचा निर्णय चुकला तर चाळीसगावचा विकास थांबेल," असा इशारा देत, नगराध्यक्षांसह नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला (भाजपा) बहुमताने सत्ता देण्याची मागणी त्यांनी केली.