जिल्हाधिकारी माननीय श्री. सावन कुमार जी यांनी आज पवनी नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या ऐतिहासिक वैजेश्वर घाट कॉरिडोरच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यामुळे पवनीच्या विकासकामांना आता मोठी गती मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले असून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा 'ॲक्शन मोड'वर आल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी घाट परिसरातील भौगोलिक स्थिती, भाविकांची होणारी गर्दी आणि नियोजित कॉरिडोरचा आराखडा समजून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.