चाळीसगाव: डासांना प्रतिबंध! 'माझं गाव, माझं तीर्थ' समितीचा स्तुत्य उपक्रम; चाळीसगाव बसस्थानकात फवारणी
चाळीसगाव, दि. ९ नोव्हेंबर २०२५: सार्वजनिक आरोग्य जपण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा आणि स्तुत्य उपक्रम 'माझं गाव, माझं तीर्थ' स्वच्छता अभियान समितीने आज, रविवारच्या सुट्टीच्या दिवशी यशस्वीरित्या राबवला. समितीचे सदस्य आणि समाज सेवक श्री. विजय शर्मा यांच्या पुढाकाराने चाळीसगाव बसस्थानक परिसरात डास प्रतिबंधक औषधांची तातडीने फवारणी करण्यात आली.