चाळीसगाव: शहर विकासासाठी 'कमळा'ला एकतर्फी मतदान
चाळीसगाव नगरपरिषद निवडणुकीचे वारे जोरात वाहत असताना, शहराच्या वॉर्ड क्रमांक १७ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वतीने आज (९ नोव्हेंबर २०२५) भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला स्थानिक आमदार मंगेश चव्हाण यांनी खास उपस्थिती लावत नागरिकांशी संवाद साधला. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात झालेल्या या सभेमुळे वॉर्ड क्र. १७ मधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.