आज दिनांक 9 फेब्रुवारी सकाळी 9 वाजता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणीसाठी आज शहरातील शासकीय तंत्रनिकेतन येथील मतमोजणी केंद्र परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका मतमोजणीवेळी काही ठिकाणी गोंधळ निर्माण झाल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्