बापाने दारू का पिला असे विचारताच?, पोटच्या पोराने रागाने आपल्या बापाला कुऱ्हाडीने डाव्या हातावर वार केला. मात्र दुसरा वार डोक्यात करीत असताना सुदैवाने कुऱ्हाड दांड्यातून निखळून खाली पडल्याने बापाचा जीव वाचला. केज पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या धारूर तालुक्यातील गांजपूर येथील भारत तुकाराम धोंगडे यांचा मुलगा नितीन घोंगडे याला दारु पिण्याची सवय आहे. तो दारु पिऊन घरी आला. म्हणून त्याचे वडील भारत धोंगडे यांनी "तु दारु पिऊन का आलास?" असे विचारले होते.