साकोली: लाखांदूर रोडवरील बिना परवानगीने सागाची झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत वनपरिक्षेत्राधिकार्यांकडे तक्रार
साकोली येथील तलाव वार्डमधील लाखांदूर रोडवरील विकास गहाणे यांच्या मालकीच्या जागेत असणारे सागाची सुमारे 90 हजार रूपये किमतीची सागाची झाडे सुनील लांजेवार संजय लांजेवार अनिल गहाणे यांनी कुठलीही परवानगी न घेता तोडल्याने यांच्यावर कारवाई करावी अशी तक्रार विकास गहाणे यांनी वनपरीक्षेत्र अधिकारी साकोली व साकोली पोलीस स्टेशन येथे गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबरला दुपारी चार वाजता लेखी अर्जाद्वारे केली आहे