आज दिनांक पाच डिसेंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय येथे मनसे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन देऊन हा प्रकार उघड केलाय. नांदेड महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने मतदार यादी जाहीर झालीये. या यादीत तब्बल 2800 मतदार ओळख पत्राचा पत्ता प्रभाग क्रमांक 5 ची प्रारूप मतदार यादी पाहताना जवळपास एक हजार विद्यार्थ्यांच्या मतदार ओळखपत्रावर IIB कोचिंग क्लासेस, जवळपास सहाशे ओळखपत्रावर RCC कोचिंग क्लासेस, तर चारशे मतदार ओळख पत्रावर फार्मसी महाविद्यालयाचा पत्ता आहे.