छत्रपती संभाजीनगर : मी पालकमंत्र्यांचे भ्रष्टाचार पुराव्यासहित बाहेर काढत होतो, म्हणूनच पोलिसांनी हाताशी धरून आणि सत्तेचा गैरवापर करून माझ्यावर ॲट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल केले," असा खळबळजनक आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज केला. बेगमपुरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ॲट्रॉसिटी गुन्ह्या संदर्भातील सुनावणीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.