बुलढाणा: घाटाखालील वाळू पोहोचत आहे बुलडाण्यात, तहसीलदारांनी रिलायंस मॉल जवळ पकडला अवैध वाळूचा टिप्पर
काल रात्री बुलडाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी घाटाखालून येणाऱ्या अवैध वाळूच्या टिप्परला पकडले आहे.बुऱ्हानपूर, मध्यप्रदेश येथील मुदत बाह्य रॉयल्टीच्या आधारे वाळूची अवैध वाहतूक या टिप्पर द्वारे केली जात होती.या कारवाईमुळे घाटाखालून बुलडाण्यात येणाऱ्या वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.