मुदखेड: अशोक चव्हाण यांच्या घरात चार वेळा मुख्यमंत्रीपद होत, आता मुदखेड मध्ये गल्लो गल्ली फिरत आहेत - आमदार हेमंत पाटील म्हणाले
Mudkhed, Nanded | Nov 28, 2025 आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या दरम्यान मुदखेड येथे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील म्हणाले अशोक चव्हाण यांच्या घरात चार वेळा मुख्यमंत्रीपद होत आता इथे गल्लो गल्ली फिरत आहेत .. एकदा चान्स द्या म्हणत आहेत. 72 वर्ष तुम्हाला चान्स दिला. नांदेड जिल्ह्यात तुमच्या शिवाय कुणाला चान्स दिला, आता अशोक म्हणतात मुदखेड ला बारामती करून दाखवतो पण तुम्ही दोन वेळा मुख्यमंत्री असताना करु शकला नाहीत.आता तुम्ही बारामती नाही पैसे वाटून लोकांवर भानामती करत आहात अशी टीका हेमंत पाटील यांनी केली