येथील महाऔष्णिक वीज केंद्राच्या कालबाह्य झालेल्या जुन्या २१० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक ३ व ४ मधून मोठ्या प्रमाणत प्रदूषण होत आहे. त्यामुळे प्रस्तावित ८०० मेगावॅट क्षमतेचा नवीन संच अल्ट्रा सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित राहणार आहे. या संचाचे कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. या संच निर्मितीवर किमान ९ हजार ८९२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.