घनसावंगी–अंबड रोडवर भीषण अपघात; युवक जागीच ठार रेडियम नसल्यामुळे डोक्यात हेल्मेट असूनही गेला प्राण! ऊसाचे वाहने किती बळी घेणार? घनसावंगी प्रतिनिधी घनसावंगी–अंबड मुख्य रस्त्यावर मंगळवारी (दि. ३) सायंकाळी पेट्रोल पंपाजवळ दुचाकीची ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात घनसावंगी तालुक्यातील शिंदे वडगाव येथील महादेव नामदेव सोलाट (वय ३२) यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रॉलीला पाठीमागील बाजूस रेडियम नसल्यामुळे अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने हा अपघात झ