वर्धा: ज्युदोत वर्ध्याची पदकांची लयलूट: खेळाडूंची चमकदार कामगिरी;राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार कनक!
Wardha, Wardha | Nov 16, 2025 क्रीडा विश्वातील एका अत्यंत उत्साहवर्धक बातमीने आजच्या बुलेटिनची सुरुवात करूया. क्रीडा क्षेत्रात वर्धा जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे. नुकतेच पुणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत वर्धा जिल्हा ज्युदो असोसिएशन, हिंगणघाट येथील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा राहुल असल्याचे आज 16 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.