आजपर्यंत साई कॉलेजने संलग्नता घेतली नाही. त्यासाठी फीसही भरली नाही. त्यामुळं विद्यापीठ परीक्षा घेऊ शकले नाही. त्याची सर्वस्वी जबाबदारी ही त्या कॉलेजची असल्याचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांनी सांगितले. संलग्नतासाठी आलेल्या प्रस्तावा वरून विद्यापीठाच्या समितीने कॉलेजमध्ये जाऊन चौकशी केली. त्यात प्राध्यापक नाहीत.