घनसावंगी तालुक्यातील वडीरामसगाव येथे एक महिला राहत्या घरी दारूविक्री करीत असल्याची माहिती तीर्थपुरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अवैधरीत्या दारूविक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध तीर्थपुरी पोलिसांनी मंगळवारी दुपारी कारवाई केली. यावेळी २०४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.